गुडघे ठणकतात? करा हे उपाय आजच

काही सवयींमुळे गुडघेदुखी टाळता येते. प्रत्येकाने या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. 

महिलांमध्ये गुडघेदुखीचा त्रास फार लवकर सुरू होतो. त्यामागे अनेक कारणे आहेत. सगळ्यांनाच असा त्रास होत नाही मात्र अनेकांना होतो. 

वजन जर जास्त असेल तर त्याचा ताण गुडघ्यावर येतो. त्यामुळे दुखणे सुरू होते. जर वजन गरजेपेक्षा जास्त आहे तर वेळीच वजन कमी करा. 

तुम्ही कोणत्या चपला वापरता याचाही विचार करायला हवा. पायांवर ताण येईल अशा चपला वापरल्याने दुखणी सुरु होतात. 

स्ट्रेचिंग हा व्यायाम प्रकार करा. त्यामुळे सांधे, हाडे, स्नायू आखडत नाहीत. अवयवांमध्ये लवचिकता येते.

नियमित व्यायाम करा. पायाच्या हालचाली करत राहा. असे केल्याने गुडघे मजबूत राहतील.

सायकलिंग करा. जवळच्या अंतरासाठी गाडीऐवजी सायकल वापरा. पायांचे आरोग्य कायम चांगले राहिल. 

त्रास फारच होत असेल तर फिजिओथेरिपी घ्या. त्यामुळे गुडघ्याला आराम मिळेल. 

Click Here