८ महिन्याच्या बाळाचा जीव वाचवणारी खुशबू पटाणी आहे तरी कोण?

सध्या सगळीकडे चर्चा आहे ती खुशबू पटाणीची. लोकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. कारण जाणून घ्या. 

दिशा पटाणी तिच्या सौंदर्यासाठी फार लोकप्रिय आहे. दिशा बॉलिवूडमध्ये आल्यावर नॅशनल क्रश झाली होती. मात्र दिशाची बहीण सध्या दिशापेक्षा जास्त लोकप्रिय झाली आहे.

दिशा पटाणीच्या कुटूंबामध्ये सैन्यात भरती असणारे अनेक जण आहेत. तिची बहीण खुशबू पटानीही एक सैनिक आहे. नेटकरी खुशबूला खऱ्या आयुष्यातील हिरो असे संबोधतात.

खुशबू सध्या सैन्यामध्ये कार्यरत नाही. मात्र तिने फिसनेस ट्रेनिंगचा कोर्स करुन आता ती स्वतः एक कोच म्हणून काम करते. 

खुशबूच्या इंस्टाग्रामवरील पोस्टनुसार ती सध्या राशी भविष्याचाही अभ्यास करत आहे. लोकांना मार्गदर्शन करण्याचे काम ती करते.

दिशा प्रमाणेच खुशबूचेही बरेच चाहते आहेत. सोशल मिडियावर सतत काही ना काही माहितीपर पोस्ट ती करत असते. 

खुशबू पटानी मध्यंतरीही तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली होती. मात्र सध्या ती एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. 

खुशबूला बरेलीच्या एका पडक्या घरामध्ये ८ महिन्यांची लहान मुलगी मिळाली. रेल्वे स्टेशनवरुन आईच्या चुकीमुळे हरवलेल्या या मुलीला खुशबूमुळे जीवनदान मिळाले. 

खुशबूचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांमार्फत तिचे भरपूर कौतुक केले जात आहे. 

Click Here