अभिनेत्री काजोलच्या हिरव्या साडीतल्या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
काजोल बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ती बॉलिवूडवर अधिराज्य गाजवते आहे.
काजोल सध्या तिचा आगामी सिनेमा 'मां'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
नुकतेच तिने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका इव्हेंटला हजेरी लावली होती. यावेळी तिच्या लूकची सर्वत्र खूप चर्चा झाली होती.
यावेळी काजोलने डार्क ग्रीन रंगाची प्लेन साडी नेसली होती. त्यावर फुल स्लीव्हजचा डीप नेकचा ब्लाउज परिधान केला होता.
या साडीत काजोल खूपच सुंदर दिसत होती. तिने या साडीतले फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
काजोलच्या या साडीतल्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.