अभिनेत्री मालविका राजने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिलीय.
मालविका राज प्रेग्नेंट असून लग्नाच्या २ वर्षांनंतर तिच्या घरी पाळणा हलणार आहे.
नुकतेच मालविका राजने बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोत तिचा पती प्रणव बग्गाही दिसत आहे.
यावेळी मालविकाने वेस्टर्न आउटफिटमध्ये फोटोशूट केलंय. तिने लव्हेंडर रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केलाय.
फोटोशूटमध्ये मालविका आणि प्रणवनेही रोमँटिक पोझ दिल्या आहेत. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
प्रणव एक व्यावसायिक आहे. तो आणि मालविका कॉमन फ्रेंड्सद्वारे भेटले आणि १० वर्षांहून अधिक काळ डेट केले. त्यानंतर त्यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये गोव्यात लग्न केले.