अभिनेत्रीने सांगितल्या तिच्या भावी जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा
अभिनेत्री जुई गडकरी सध्या ठरलं तर मग मालिकेत काम करताना दिसते आहे.
जुई गडकरीने साकारलेली सायली प्रेक्षकांना खूप भावते आहे. तिच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.
सोशल मीडियावर अनेकदा चाहत्यांनी तिच्या लग्नाबद्दल विचारलं आहे. एवढंच नाही तर काहींनी थेट लग्नाची मागणीदेखील घातलीय.
जुईने सुलेखा तळवळकरांच्या एका शोमध्ये तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल असलेल्या अपेक्षाबद्दल सांगितले होते.
ती म्हणाली होती की, ''मला माझ्यासारखाच साधा, सरळ, सोपा, शुद्ध शाकाहारी आणि देवाचं करणारा नवरा हवा.''
जुई पुढे म्हणाली होती की,''कुटुंब जपणारा हवा. मला जसं कुटुंबात राहायला आवडतं, तसं त्यालाही कुटुंबात रहायला आवडलं पाहिजे.''
मनोरंजन क्षेत्राला समजून घेणारा असा व्यवस्थित हवा. माझ्या कुटुंबात खूप शांत आणि संयमी लोक आहेत. ते त्याचे खूप लाड करतील. त्यामुळे त्याने त्यांच्यानुसार सांभाळून घेतले पाहिजे.
मुख्य म्हणजे मला सांभाळून घेणारा हवा, असेही जुईने म्हटले.