आहारात तोंडलीची भाजी असणे आरोग्यासाठी चांगले. जाणून घ्या किती फायदेशीर आहे.
तोंडलीची भाजी खाल्याने बोबडी वळते, असे जरी आपण लहानपणी ऐकले असले तरी तोंडली किती आरोग्यदायी आहे हे आपल्याला माहिती नाही.
वर्षभर मिळणारी ही भाजी पावसाळ्यात व उन्हाळ्याच्या शेवटी जास्त छान पिकते. त्यामुळे मस्त ताजी अशी तोंडली आहारात असायला हवी.
तोंडलीमध्ये फायबर असते. त्यामुळे पचन सुधारते बद्धकोष्टतेचा त्रास असेल तर तोंडली नक्की खावी.
तोंडलीत फायबर जास्त असते आणि कॅलरिज कमी असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठीही तोंडलीचा फायदा होतो.
रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तोंडलीची भाजी खावी. तोंडलीत बायोअॅक्टीव्ह संयुगे असतात. त्यामुळे साखरेवर नियंत्रण राहते.
तोंडली अँण्टी ऑक्टिडंट्सने परिपूर्ण असते. त्यामुळे त्वचेसाठी चांगली ठरते. तसेच केसांसाठीही चांगली ठरते.
तोंडलीची भाजी करावी. तसेच भाजलेलं तोंडलही छान लागतं. भरली तोंडली मस्त लागतात.