प्रेमासाठी सारे काही! आंतरधर्मिय लग्न करणारे भारतीय क्रिकेटपटू..
पाहा क्रिकेटर्सच्या गाजलेल्या लव्हस्टोरी. समाजाच्या विरोधात जाऊन प्रेमाला प्राधान्य दिले.
भारताच्या क्रिकेट संघातील काही खेळाडूंची लव्हस्टोरीही वादळी आहे. जात-धर्म त्यांच्या प्रेमाच्या आड आले नाहीत. दुश्मन जमान्याला त्यांनी जुमानले नाही.
मोहम्मद अजहरुद्दीन व संगीता बिजलानी यांची कहाणी कायम चर्चेत होती. लव्हस्टोरी गाजली आणि २०१० साली त्यांचा घटस्फोटही गाजला.
दिनेश कार्तिकने दिपिका पल्लीकल या स्क्वॅश खेळाडूशी लग्न केले. दिपिका ख्रिश्चन आहे तर दिनेश हिंदू. दोघांनी भारताचं आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलं आहे.
मोहम्मद कैफ या क्रिकेटरने पुजा यादव या हिंदू महिलेशी विवाह केला.
२००२ साली अजीत अगरकरने फातिमा घडियाली या आपल्या मैत्रिणीशी लग्न केलं आणि आज ते सुखानं संसार करत आहेत.
शिवम दुबेची लव्हस्टोरी तर फुल फिल्मीच आहे. त्याने अंजूम खान या मॉडेलशी लग्न केले. ती त्याच्यापेक्षा वयानं मोठी आहे. दोन मुलांसह ते सुखानं संसार करत आहेत.
जहीर खान फार लोकप्रिय खेळाडू. त्याच्या पत्नीचे नाव सागरीका घाटगे आहे. आंतरधर्मिय लग्न आहे. नुकतेच त्यांनी गुढीपाडवा आणि ईद घरी उत्साहात साजरे केल्याचे फोटो शेअर केले.
युवराज सिंह व हेजलची लव्ह स्टोरी तर फार प्रसिद्ध आहे. हेजल ख्रिश्चन आहे तर युवराज शीख.