पहिल्यांदाच BCCIच्या सेंट्रल करारात मिळालं स्थान
BCCIने टीम इंडियाच्या खेळाडूंची २०२४-२५ साठी वार्षिक कराराची यादी आज जाहीर केली.
यंदाच्या ताज्या यादीत गेल्या वर्षीच्या तुलनेत एकूण ५ नव्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
गेल्या वर्षभरात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरचे कराराच्या यादीत पुनरागमन झाले.
देशांतर्गत क्रिकेट न खेळण्यावरून चर्चेत राहिलेल्या इशान किशनला देखील यादीत संधी देण्यात आली.
याव्यतिरिक्त, तडाखेबंद सलामीवीर अभिषेक शर्मा याला पहिल्यांदाच करारबद्ध करण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलिया कसोटीत दमदार शतक ठोकणाऱ्या नितीश कुमार रेड्डी यालाही यादीत पहिल्यांदाच स्थान मिळाले.
यासह मिस्ट्री स्पिनर म्हणून उदयास येत असणाऱ्या वरूण चक्रवर्तीलाही प्रथमच करारबद्ध करण्यात आले.