कलाकंद घरी बनवण्याची सोपी पद्धत 
एकदम कमी साहित्य वापरून घरच्या घरी स्वादिष्ट मिठाई तयार होणार 

कलाकंद बनवण्यासाठी साहित्य
1 लिटर दूध, 1 वाटी पिठी साखर, वेलची पूड, लिंबाचा रस किंवा व्हिनेगर आणि सुकामेवा. 

पनीर बनवा
 दूध उकळवून, लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घालून फाडून घ्या आणि पनीर तयार करा

दुधाचा खवा बनवा
 एका वेगळ्या भांड्यात दूध मंद आचेवर घट्ट होईपर्यंत आटवून घ्या.

 सर्व एकत्र करा
 तयार पनीर कुस्करून घ्या आणि त्याला घट्ट झालेल्या दुधात मिसळा.

साखर घाला
 मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात पिठी साखर आणि वेलची पूड घालून चांगले मिसळा.

मिश्रण शिजवा
 मिश्रण घट्ट होईपर्यंत आणि मिश्रणातून पाणी निघेपर्यंत शिजवा.

सेट करा
 मिश्रण एका ताटात किंवा ट्रेमध्ये काढून सुकामेवा घालून एकसारखे पसरवा.

थंड होऊ द्या
 मिश्रण थंड झाल्यावर त्याचे तुकडे करा.

दूध फाडल्यानंतर त्यापासून कलाकंद बनवल्याने तो अधिक चवदार होतो आणि त्यासाठी जास्त वेळ लागत नाही

Click Here