हिवाळ्यात वारंवार आजारी पडायचं नसेल तर पुढे सांगितलेली काही फळं नियमितपणे खायलाच हवीत..
रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर व्हिटॅमिन सी असणारी फळं जास्त प्रमाणात खायला हवीत. त्यासाठी या दिवसांत येणारी संत्री नेहमी खा.
व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात देणारं आणखी एक फळ म्हणजे पेरू. मधुमेहींसाठीही पेरू खाणं फायद्याचं ठरतं.
एका छोट्या आवळ्यात जवळपास २५० ते ३०० मिलीग्रॅम एवढं व्हिटॅमिन सी असतं. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी या दिवसांत आवळेही खा.
१०० ग्रॅम किवीमध्ये जवळपास ९० मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी असतं. त्यामुळे बऱ्याचदा डॉक्टर किवी खाण्याचा सल्ला देतात.