आपण मोठ्या हौशीने लोणचं घालतो. पण कधी कधी लोणचं घातल्यावर काही दिवसांतच त्यावर बुरा येऊ लागतो.
लोणच्यावर बुरशी निर्माण झाली की ते खूप लवकर खराब होतं आणि टाकून द्यावं लागतं. म्हणूनच लोणच्यावर बुरा येऊ नये म्हणून काही खास टिप्स..
पहिली गोष्ट म्हणजे लोणचं ज्या बरणीमध्ये भरणार असाल ती पुर्णपणे कोरडी आणि स्वच्छ असावी. तिच्यामध्ये ओलसरपणा अजिबात नको.
लोणच्याची बरणी बांधून ठेवण्यासाठी तुम्ही जो सुती कपडा वापरता तो ही स्वच्छ आणि कोरडा असावा. त्यावर धूळ बसू देऊ नका.
लोणच्यामध्ये मीठ कमी झालं की लोणचं लवकर खराब होतं. त्यामुळे लोणचं घातल्यावर त्यातलं मीठ बरोबर आहे ना हे २ ते ३ वेळा तपासून पाहा.
लोणच्याची बरणी नेहमी थंड, कोरड्या जागी पण भरपूर, स्वच्छ सुर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी ठेवावी.
लोणचं बरणीमध्ये भरल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस ती बरणी दररोज उघडावी आणि तिच्यातलं लोणचं खाली- वर हलवून घ्यावं.
या गोष्टी न चुकता केल्या तर लोणचं छान मुरेल आणि वर्षभर टिकेल.