असली आणि बनावट मखाण्यातील फरक कसा ओळखायचा? 

मखाणे खाणे फायदेशीर असले तरी आजकाल बनावट मखाणे अगदी सहज विकले जातात.

आजकाल हेल्थ आणि वेटलॉससाठी बरेचजण आपल्या डाएटमध्ये मखाण्यांचा समावेश करतात. 

मखाणे खाणे फायदेशीर असले तरी आजकाल बनावट मखाणे अगदी सहज विकले जातात. 

बनावट मखाणे खाण्याने आरोग्याला फायदा होण्याऐवजी नुकसानच होऊ शकते. अस्सल चांगल्या दर्जाचे मखाणे ओळखण्यासाठी खास टिप्स.

अस्सल चांगल्या दर्जाच्या मखाण्यांचा रंग पांढराशुभ्र असतो, त्यांचा आकार गोल असून त्यांचे टेक्श्चर थोडे खरखरीत असते. 

बनावट मखाण्यांचा आकार एकसारखाच असतो, त्यांचा रंग चमकदार पांढरा असतो. याचबरोबर ते हाताला अगदी गुळगुळीत देखील लागतात. 

एका भांड्यात पाणी घेऊन त्यात मखाणे टाका, जे मखाणे पाण्यावर तरंगतील ते असली आहेत, जे पाण्यात बुडून तळाशी जातील ते बनावट मखाणे आहेत. 

अस्सल मखाण्यांची चव फ्रेश व खाताना कुरकुरीत लागतात, बनावट मखाण्यांची चव केमिकल्सयुक्त आणि वेगळीच लागते. 

मखाणे विकत घेताना चांगल्या दुकानातून किंवा खात्रीशीर ब्रँडचेच मखाणे विकत घ्यावे. 

पॅकेजिंग मखाणे विकत घेताना एक्स्पायरी डेट आणि मॅनुफॅक्चरिंग डेट तपासूनच मग पॅकेट विकत घ्यावे.

Click Here