हाताच्या तळव्याला घाम आला की साधे कामही करता येत नाही. पाहा का. करायचे, सोपे उपाय.
घाम तर सगळ्यांनाच येतो पण काहींच्या हाताच्या तळव्याला भरपूर घाम येतो. वस्तू हातात पकडणेही कठीण होते.
असा त्रास असेल तर हाताला टॅलकम पावडर लावा. जवळ एक लहान डबा ठेवायचा. हात लगेच कोरडे होतात.
या घामाची तीव्रता कमी करणारे अँटीपरस्पिरंट स्प्रे किंवा रोल-ऑन बाजारात मिळतात. त्याचा वापर करा.
खुप तिखट, गरम, कॅफीन असे पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी करा. त्यामुळे हाताला घाम येण्याची प्रक्रिया जास्त होते.
तसेच मनगटात घालण्यासाठी बॅण्ड मिळतो. त्यामुळे तळव्याला घाम येत नाही. आलाच तरी तीव्रता कमी होते. असा बॅण्ड वापरा.
विशेष उपचार जसे आयोंटोफोरेसिस, औषधोपचार किंवा इतर वैद्यकीय पद्धतीने आराम मिळू शकतो.