मोबाइलचं व्यसन सोडण्यासाठी ५ उपाय

कायम मोबाइल वापरता? सवय बदलणे गरजेचे पाहा काय करायला हवे. काही नियम लावायचे.

तुमचा स्क्रिन टाईम किती आहे? नक्कीच सात ते आठ तास असणार. कारण तेवढा टाईम तर अगदीच कॉमन झाला आहे. काम असताना इलाज नाही मात्र त्या व्यतिरिक्त यंत्रे वापरणे टाळायला हवे. 

लहान काय मोठे काय सगळ्यांनाच मोबाइलचे अॅडीक्शन झाले आहे. ते कमी करण्यासाठी काही साधे उपाय आहेत ते करायला हवे. 

मोबाइलमध्ये टाईम लिमिट सेट करण्यासाठी एक फिचर असते. त्याचा वापर करा. कामा पुरताच फोन वापरायचा नंतर त्याचा तो बंद होतो. 

तुमचे छंद जोपासा. फिरायला जा. इतर काही कामे करा. व्यायाम करा. गप्पा मारा. वेळ चांगल्या गोष्टींत घालवा. 

मोबाइलमध्ये कोणता अॅप किती वापरला हे पाहता येते. ते सतत पाहा आणि उगाचच कोणता अॅप वापरला जातो ते पाहून त्या वापरावर नियंत्रण ठेवा. 

झोपताना मोबाइलला हातच लावायचा नाही. तासंतास मोबाइल पाहत पडल्याचा आरोग्यावर परिणाम होतो. 

वाचन करायला सुरवात करा. वाचनात मन रमले की मोबाइलचा हेवा कमी वाटेल. 

जेवताना मोबाइल वापरायचा नाही असा नियमच करा. नो मोबाइल झोन घरातच तयार करा. लहान मुलांसाठी हा उपाय अगदी योग्य आहे. 

Click Here