स्वयंपाक घरात लावलेला एक्झॉस्ट पंखा खूप चिकट, तेलकट होऊन जातो.
तो स्वच्छ करण्यासाठी कितीही मेहनत घेतली तरी ताे म्हणावा तसा स्वच्छ होतच नाही, असा अनेकांचा अनुभव असतो.
म्हणूनच आता पुढे सांगितलेले २ अगदी सोपे उपाय पाहा. हे उपाय केल्याने कमी मेहनतीत आणि कमी वेळेत एक्झॉस्ट पंखा स्वच्छ होईल.
त्यासाठी व्हिनेगर, बेकिंग सोडा आणि पाणी यांचं मिश्रण तयार करा. हे पाणी एक्झॉस्ट पंख्यावर शिंपडा.
त्यानंतर १० मिनिटाने तारेची घासणी किंवा ब्रश घेऊन पंखा स्वच्छ करा. त्याच्यावरचा तेलकटपणा अगदी लगेच निघून जाईल.
याशिवाय गरम पाणी, डिशवॉश लिक्विड, लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा हे मिश्रण वापरूनही तुम्ही एक्झॉस्ट पंखा अगदी लगेच स्वच्छ करू शकता.