स्क्रॅचेस न पडू देता चष्मा कसा स्वच्छ करायचा?

चष्मा वापरणाऱ्यांना हा त्रास होतोच.. कितीही व्यवस्थित पुसलं तरी चष्म्याला स्क्रॅचेस येतात... 

एकदा काचेवर स्क्रॅचेस आले की मग तो चष्मा वापरावा वाटत नाही. कारण समोरचं धुसर दिसतं..

म्हणूनच पुढे सांगितलेल्या पद्धतीने चष्मा स्वच्छ करा.. जुना झाला तरी त्यावर स्क्रॅचेस येणार नाहीत.

एका पसरट भांड्यात कोमट पाणी घ्या आणि त्यामध्ये एखादा मिनिट चष्मा बुडवून ठेवा.. तुमचेही हात यादरम्यान स्वच्छ धुवून घ्या.

यानंतर चष्म्याच्या काचेवर क्लिनिंग लिक्विड किंवा लेन्स क्लिनरचा एखादा थेंब टाका आणि बोटांनीच चष्मा स्वच्छ करून घ्या.

पुन्हा एकदा पाण्याखाली धरून चष्मा स्वच्छ धुवून घ्या.

यानंतर ओलसर असतानाच मायक्रो फायबरचा कपडा वापरून काचा स्वच्छ पुसून घ्या. या पद्धतीने रोज चष्मा स्वच्छ केल्यास त्यावर स्क्रॅचेस येणार नाहीत. 

Click Here