तुमचा आत्मविश्वास कमी आहे की एकदम तगडा आहे? कसे ओळखाल, ही घ्या टेस्ट आणि ठरवा
काही चांगल्या सवयीच असतात ज्या माणसाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतात.
कोणामध्ये आत्मविश्वास भरपूर असतो तर कोणामध्ये कमी असतो. या काही सवयी आत्मविश्वास असल्याचे लक्षण आहेत.
आत्मविश्वासी माणसे शक्य असलेली ध्येये ठरवतात. जे आपल्याला आयुष्यात मिळणार नाही त्यासाठी रडत नाहीत. तर जे मिळवायचे आहे त्यासाठी काम करतात.
स्वत:चा खरा स्वभाव लोकांसमोर दाखवायला ते घाबरत नाहीत. समूहानुसार स्वभाव बदलत नाहीत. स्वत:च्या मतांवर कायम ठाम राहतात.
आत्मविश्वास असला की कम्फर्टझोनमधून बाहेर पडायला मदत होते. आत्मविश्वासी व्यक्तीला नवीन काही तरी काम करायचे असते. एकाच प्रकारचे सरळ रेषेतील जीवन त्यांना आवडत नाही.
अशी माणसे स्वत:चे आरोग्य, आहार आणि आनंद जपून असतात. गरज असेल तेवढी झोपही घेतात.
समाजात वावरताना माणसाची देहबोली फार महत्त्वाची ठरते. माणसामध्ये आत्मविश्वास असला की त्याकडे पाहूनच तो जाणवतो. बोलणे वागणे अगदी चालणेही आत्मविश्वास दर्शवते.
लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न अशी माणसे करत नाहीत. त्यांना फक्त त्यांचे ध्येय महत्त्वाचे असते. लोकांचे मत त्यांना फार महत्त्वाचे वाटत नाही.
आत्मविश्वास असला की माणसाला पराभव स्वीकारून पुढे जाण्यात मदत होते. एखाद्या पराभवाचा बाऊ न करता त्याकडे ते एक धडा म्हणून बघतात.