आळस होईल छुमंतर! सुपर सेवन टिप्स

सकाळी सकाळी आळसावल्यासारखे वाटत असेल तर पाहा काय करायला हवे. 

सकाळी उठायचे म्हटले की अगदी जीवावर येते. थोडावेळ आणखी झोपावे असे वाटते. सकाळ प्रसन्न होत नाही मग दिवसभर चिडचिड होते. 

सकाळी उत्साहात उठायचे असेल तर काही सवयी लावून घ्या. झोपताना काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. सकाळी उठताना अजिबात आळस जाणवणार नाही. 

लवकर आणि वेळेत झोपणे फार गरजेचे असते. उशीरा झोपल्यावर सकाळी उठताना आळस जाणवतो कारण झोप अपूर्ण राहते. मात्र लवकर झोपल्यावर शरीर थकत नाही. 

झोपण्यापूर्वी मोबाइल पाहण्याची सवय अगदी वाईट. त्यामुळे डोक्याला आणि डोळ्यांना शांतता मिळत नाही. झोपताना मोबाइल जवळ ठेवायचाच नाही. 

रात्रीचे जेवण बेताचेच असावे. पोट जरा रिकामेच ठेवावे. पोट गच्च भरेपर्यंत खाऊ नये. रात्रीतून पचेल एवढेच जेवायचे.

उठताना खिडकीतून येणार्‍या प्रकाशाकडे पाहायचे. दिवा लावायचा नाही. नैसर्गिक प्रकाशामुळे आलेली जाग त्रासदायक ठरत नाही. 

सकाळी उठल्याउठल्या पाणी प्यायचे. रात्री झोपतानाही पाणी प्यायचे. पाण्यामुळे ताजेतवाने वाटते. 

सकाळी उठल्यावर हालचाल करायची. शांत पडून राहिल्यामुळे आळस आणखी वाढतो. फेरी मारा किंवा स्ट्रेचिंग करा. अवयव मोकळे करायचे.   

Click Here