पावसाळ्यात प्या ६ वाफाळती पेयं, सुख म्हणजे नक्की..
पावसाळ्यात प्या ही काही मस्त पेयं. घरी करायला अगदी सोपी.
पावसाळा आला की काहीतरी गरमागरम प्यायची इच्छा व्हायला लागते. चहा तर हवाच. पण इतरही काही मस्त चविष्ट पेय असतात. जी पावसात प्यायला हवीत.
चहाप्रेमी आणि कॉफीप्रेमी यांच्यात कायम वाद असतो. चहा चांगला की कॉफी मात्र दोन्ही पेय आपापल्या जागी छानच आहेत. पावसात छान फिल्टर कॉफी प्यायलाही मज्जाच येते.
हॉट चॉकलेट हे सध्या तरुण वर्गात फार लोकप्रिय आहे. घट्ट एकदम चॉकलेटी चवीचे हे पेय अगदी छान लागते. पावसातही आणि हिवाळ्यातही.
लेमन टी हा चहाचा प्रकारही चवीला अगदी छान असतो. वजनाची चिंता असेल तर हे पेय बिनधास्त प्या. कमी साखर घातली तरी छान लागते.
हनी जिंगर टी म्हणजे वजन कमी करण्यासाठी आणि पावसाळ्याची मज्जा घेण्यासाठी अगदी योग्य पेय. करायला अगदीच सोपे आहे.
आणखी एक खास चवीचे पेय म्हणजे उकाळा. हळद घालून आणि सुकामेवा घालून हे गरमागरम पेय करता येते. घशासाठी अगदी चांगले असते.
कोको मिल्क लहान मुलांना आपण देतो. मात्र ते लहानांनीच प्यावे असे नाही. फार छान लागते.