आजचे राशिभविष्य, १३ फेब्रुवारी २०२६: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष- आज आपणास आपला संताप नियंत्रित ठेवावा लागेल. कोणत्याही कामात व्यत्यय येण्यास हा संताप कारणीभूत ठरेल.
वृषभ- आज कार्यपूर्तीस होणारा विलंब व शारीरिक अस्वास्थ्य ह्यामुळे मनात नैराश्याची भावना बळावेल. कामाचा व्याप वाढल्याने मानसिक बेचैनी राहील. प्रवासात विघ्न येण्याची शक्यता आहे.
मिथुन- भारी वस्त्रे, स्वादिष्ट भोजन व वाहन सुख मिळेल. भिन्नलिंगी व्यक्तीकडे आकर्षित व्हाल. कुंभ संक्रांतीपासूनचा एक महिना तुमच्यासाठी सामान्यापेक्षा चांगला असेल.
कर्क- नोकरदारांना लाभ होतील. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. कार्यात यश मिळेल. स्त्रीयांच्या सहवासात आनंदित व्हाल. आपल्या आधीन असणार्या व्यक्ती व सहकारी ह्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल.
सिंह- स्त्री वर्गाकडून अधिक सहकार्य मिळेल. शरीर प्रकृती उत्तम राहील. परोपकाराचे कार्य करण्यात धन्यता वाटेल. सिंह राशीच्या लोकांसाठी हे गोचर चांगले राहील. जोडीदारासोबतचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न करा.
कन्या- आपणाला आज प्रतिकूलतेला तोंड दयावे लागेल. आरोग्य यथा तथाच राहील. मनाला चिंता लागून राहील. आईशी असणारे संबंध दुरावतील किंवा तिची प्रकृती बिघडेल. स्वकियांशीच खटके उडून मतभेद निर्माण होतील.
तूळ- आज एखाद्या मांगलिक कार्या निमित्त प्रवासाचा बेत आखाल. भावंडांशी खेळीमेळीच्या वातावरणामुळे घरगुती प्रश्नांवर नीट चर्चा होईल. कामा निमित्त बाहेर जावे लागेल. परदेशातून चांगल्या बातम्या मिळतील.
वृश्चिक- आज घरात सुख शांती नांदेल. नातलग व मित्रांचे आगमन होईल. स्वादिष्ट भोजन मिळेल. मांगलिक कार्यावर खर्च होईल. अलंकार व सुगंधी पदार्थांची खरेदी कराल. आपल्या वाणीचा प्रभाव इतरांना मोहीत करेल.
धनु- आजचा दिवस प्रवासाचा आहे. ठरविलेली कामे पूर्ण होतील. शरीर व मन स्वस्थ राहिल्यामुळे आपण उत्साही व आनंदी राहाल. कुटुंबात मंगल कार्ये ठरतील. स्वकीयांशी संवाद साधल्याने मन प्रसन्न राहील.
मकर- आज एखाद्या गूढ विषयाची गोडी लागेल. आपण त्याच्यातच मग्न व्हाल. तसेच त्यासाठी खर्च देखील कराल. कोर्ट - कचेरी संबंधी कामे निघतील. व्यावसायिक कामात विघ्न येईल.
कुंभ- व्यवसायात लाभ होईल. मित्र भेटतील व त्यामुळे आपणास आनंद होईल. त्यांच्यासह प्रवास सुद्धा करण्याचे ठरवाल. नवीन कामाची सुरूवात फायदेशीर ठरेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील.
मीन- आजचा दिवस व्यापार - व्यवसायात लाभ मिळवून देणारा आहे. नोकरीत आपल्या यशामुळे वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. पदोन्नती संभवते. व्यापार्यांना व्यापारात लाभ व वृद्धी होईल.