सर्दीने वाहतंय नाक? रामबाण घरगुती उपाय 

सर्दी होईल बरी. करा हे घरगुती उपाय. अगदी सोपे आणि रामबाण. 

हवामान बदललं की सर्दी-खोकला हा त्रास जवळपास प्रत्येकालाच होतो. औषधं घेण्याआधी काही घरगुती उपाय केल्यास हा त्रास नैसर्गिकरीत्या कमी होऊ शकतो. 

गरम पाण्याची वाफ घेतल्याने नाकातील कफ मोकळा होतो आणि श्वास घेणं सोपं होतं. त्यात कोबी, मीठ असे पदार्थ घातल्यास आणखी फायद्याचे ठरते. 

झोपण्याआधी हळदीचे दूध प्या. गरमागरम हळदीचे दूध आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. 

आल्याचा चहा नक्कीच आवडत असेल. आवडीने प्यायला जाणारा हा चहा सर्दीवर औषध म्हणूनही काम करतो. 

सर्दीमुळे डोकं दुखतं आणि सर्दी साठून राहते. त्यामुळे गरम पाण्यात मीठ घालून त्या पाण्याने गुळण्या करा. फायद्याचे ठरते. 

मध खा. गरम पाण्यासोबत मध खायचे. तसेच मध पाणीही पिऊ शकता. सर्दी - खोकला दोन्हीवर चांगला उपाय आहे. 

आहारात सूप घ्या. गरमागरम आणि जरा तिखट असे सूप प्यायल्याने सर्दी लवकर सुटते. 

Click Here