केसांची वाढ होत नसेल किंवा केस गळणंही वाढलं असेल तर पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा...
केस वारंवार कर्ल करणं, स्ट्रेटनिंग करणं टाळा. केसांवर वेगवेगळे कलर्स लावून प्रयोग करणंही टाळायला हवं.
कांद्याच्या रसामध्ये सल्फर भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे केसांची चांगली वाढ होते. म्हणून आठवड्यातून एक- दोनदा केसांना कांद्याचा रस लावा.
तुमच्या आहारातलं प्रोटीन्सचं प्रमाण वाढवा. प्रोटीनयुक्त आहार केसांसाठी चांगला असतो.
कॅस्टर ऑईल किंवा रोजमेरी ऑईल वापरून केसांना नियमितपणे मसाज करा.
केसांच्या चांगल्या वाढीसाठी शांत झोपही खूप गरजेची आहे. कारण त्यामुळे हार्मोन्स संतुलित राहतात आणि त्याचा चांगला परिणाम केसांच्या वाढीवर होतो.