आरोग्यासाठी फाय फायद्याचा असतो हा जास्वंदीचा चहा. पाहा किती उपयुक्त ठरतो.
सध्या आरोग्यदायी म्हणून लोकप्रिय झालेला जास्वंदीचा चहा हा पदार्थ भारतात फार पूर्वीपासून प्यायला जात आहे. तो पिण्याचे अनेक फायदे आहेत.
ब्लडप्रेशरचा त्रास असणाऱ्यांसाठी हा चहा फायद्याचा आहे. त्यातील पोषणतत्त्वे रक्तदाब नियंत्रित करतात.
शरीराला अॅण्टी ऑक्सिडंट्सची फार गरज असते. या चहातून चांगल्या प्रमाणात ते मिळतात. इतरही अनेक पोषण मिळते.
वजन कमी करण्यासाठी या चहाचा फायदा होतो. त्यामुळे वेट लॉस डाएटमध्ये या चहाचा समावेश असेल तर ते फाय फायद्याचे ठरेल.
पचनसंस्थेसाठी हा चहा एकदम मस्त आहे. पचनाचा काही त्रास असेल तर हा चहा औषध म्हणून प्या. पोट साफ होते आणि पोटाला आराम मिळतो.
जास्वंदीत जीवनसत्त्व सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हा चहा रोगप्रतिकार शक्ती वाढवतो. रोगराई होऊ देत नाही.
अपचन, जळजळ, पोटात डचटमळणे, सतत मळमळणे या सगळ्या त्रासांवर हा चहा परिणाम कारक आहे. त्यात दाहशामक तत्व असतात.