आरोग्यासाठी चांगला आणि करायला सोपा असा तुळशीचा काढा नक्की करुन पाहा.
सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, आदी कोणताही त्रास असो त्यावर मस्त रामबाण उपाय म्हणजे तुळशीचा काढा.
या पद्धतीने एकदा तुळशीचा काढा करुन पाहा. आरोग्यासाठी चांगला तर असतोच शिवाय चवीलाही मस्त असतो.
साहित्य - तुळशीची पाने, आलं, काळीमिरी, लवंग, दालचिनी, गूळ, हळद, वेलची पूड, पाणी
एका खोलगट पातेल्यात पाणी उकळत ठेवा. पाणी उकळल्यावर त्यात तुळशीची पाने घालायची. तसेच आल्याचा तुकडा ठेचून घालायचा आणि उकळायचे.
नंतर त्यात लवंग घाला. दालचिनीचा तुकडा घाला. काळीमिरीही ठेचून घाला. सारे पदार्थ मस्त उकळू द्यायचे.
उकळल्यावर त्यात किसलेला गूळ घालायचा. गूळ जरा विरघळू द्यायचा. गूळ विरघळला की त्यात थोडी वेलची पूड घालायची.
नंतर शेवटी थोडी हळद घालायची आणि गॅस बंद करायचा. काढा गाळून घ्यायचा. मस्त गरमागरम प्यायचा.