पौष्टिक नाचणीचा चिवडा, पाच मिनिटांचे काम 

हा पौष्टिक चिवडा नक्की करा. चवीला मस्त आणि करायला सोपा. अजिबात वजन वाढणार नाही

चिवडा हा पदार्थ भारतात घरोघरी केला जातो. त्यात अनेक प्रकार असतात. विविध प्रकारचे चिवडे चवीलाही वेगळे आणि मस्त असतात.

ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा चवीला मस्त असतोच. तसेच अगदी पौष्टिकही असतो. डाएट करत असाल तर हा चिवडा घरी असावा. 

साहित्य :शेंगदाणे, ज्वारीच्या लाह्या, डाळं, कडीपत्ता, तेल , हिरवी मिरची, मीठ, लाल तिखट, जिरे

एका कढईत थोडे तेल घ्यायचे. अगदी कमी घ्या. त्यात चमचाभर जिरे घाला आणि परता. 

जिरे परतल्यावर त्यात कडीपत्याची पाने घालायची. पाने छान परतायची मग त्यात डाळं घाला आणि परता. 

डाळं छान परतल्यावर फोडणीत शेंगदाणे घाला आणि परता. त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घाला आणि ढवळून घ्या. 

एका खोलगट पातेल्यात नाचणीच्या लाह्या घ्या. त्यात तयार केलेली फोडणी ओता. चमच्याने छान ढवळा आणि मिक्स करा. 

चवी पुरते मीठ घाला. तसेच लाल तिखट घाला आणि ढवळून घ्या. सगळे पदार्थ छान एकत्र करायचे आणि मग हबावंद डब्यात चिवडा साठवायचा. 

Click Here