खाणार का काळ्या चण्याची भेळ? पाहा चमचमीत रेसिपी

सोपी आणि पौष्टिक रेसिपी नक्की करुन पाहा. सगळे आवडीने खातील. 

काळे चणे चवीला मस्त लागतात. तसेच ते आरोग्यासाठीही फार फायद्याचे असतात. काळ्या चण्यांची उसळ भाजी फार चविष्ट लागते. 

आहारात हे चणे असावेत. काळ्या चण्याची भेळ फार चविष्ट लागते. तसेच पौष्टिकही असते. त्यामुळे नक्की करुन पाहा. 

काळे चणे रात्रभर भिजवायचे. मोड आणायची गरज नाही, फक्त भिजवायचे. सकाळी कुकरमध्ये उकडवायचे. व्यवस्थित शिजवून घ्यायचे. 

कांदा बारीक चिरायचा. तसेच हिरवी मिरची बारीक चिरायची. काकडी चिरायची. तसेच टोमॅटोही चिरायचा.

काळ्या चण्यांना मीठ लावायचे. तिखट लावायचे. जरावेळ बाजूला ठेवायचे. मस्त मुरु द्यायचे. 

एका पातेल्यात काळे चणे घ्यायचे. त्यात कांदा घालायचा आणि टोमॅटोही घालायचा. तसेच हिरव्या मिरचीचे तुकडेही घालायचे. 

सगळे छान मिक्स करायचे. त्यात थोडा चाट मसाला घालायचा आणि ढवळून घ्यायचे. एकदम मस्त अशी चण्यांची भेळ घरी करता येते. 

Click Here