५ हेल्दी पर्याय, बिंधास्त खा-नो जंक गिल्ट!

काय खावे आणि काय नाही हा मोठाच प्रश्न. पाहा चवीला मस्त आणि पौष्टिक पदार्थ.

स्नॅक्स म्हटल्यावर ते हेल्दी असू शकतात यावर विश्वास ठेवणेच जरा कठीण आहे. तळलेले तेलकट पदार्थ फक्त वजनच नाही वाढवत तर आरोग्यासाठी फार वाईट असतात.

पण मग आयुष्यात छान चव नको का? हवी ना , पण पौष्टिक आणि चविष्ट असणारे पदार्थ खाणे जास्त चांगले ठरेल. पोटालाही बरे आणि चविष्ट खाल्याचे समाधानही मिळते. 

चॉकलेट हा पदार्थ असा आहे जो खावासा वाटल्यावर खाल्याशिवाय समाधान मिळत नाही. पण बाजारात मिळणारे चॉकलेट ओरिजल नसते. त्यात भरपूर साखर असते. त्यामुळे चॉकलेटऐवजी खजूर खा. 

चमचमीत नमकीन पदार्थ खायला आवडतात? त्यात तेल भरपूर असते. त्यामुळे घरी मखाणा आणा आणि त्याचा चिवडा करुन खा. फक्त परतलेले मखाणे मस्त चविष्ट लागतात.

तळलेले खायला आवडते? मग एअर फ्राय केलेले पदार्थ खा. करायलाही सोपे असतात आणि अगदी सारखीच चव लागते. 

गार प्यायला आवडत असेल तर साखर आणि सोडा असलेले काहीही न पिता त्याऐवजी नारळ पाणी, फळांचा रस प्या. चवीला मस्त असतो आणि आरोग्यासाठी उत्तम. 

पापडासारखे पदार्थ खायला सगळ्यांनाच आवडतात. पण तळलेला पापड फारच अनहेल्दी असतो. पापड तळण्याऐवजी तो भाजून खा. 

Click Here