सुकं खोबरं खाण्याचे ६ जबरदस्त फायदे 

सुकं खोबरं आपण कधीच आवर्जून खात नाही. त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण ते आपल्या शरीरासाठी खूपच उपयोगी ठरतं. 

सुक्या खोबर्‍यात फिनॉलिक हा घटक असतो जो अँण्टिऑक्सिडंट्सप्रमाणे कार्य करतो.त्यामुळे त्वचा चांगली राहण्यासही मदत होते. 

सुक्या खोबर्‍यात प्रोटीन्स, लोह, कॅल्शिअम, मँगनीज, सेलिनियम हे घटक मोठ्या प्रमाणात असतात..

सुक्या खोबर्‍यात लोहाचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे ते गुळासोबत खाल्ल्यास हिमोग्लोबिन वाढायला मदत होते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी सुकं खोबरं उपयुक्त ठरतं.

हाडांच्या आरोग्यासाठीही सुकं खोबरं पोषक ठरतं. ते नियमित खाल्ल्याने सांधेदुखीचा त्रास कमी होतो, हाडांची झीज होत नाही.

सुकं खोबरं खाल्ल्याने पोट भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे फूड क्रेव्हिंग कमी होऊन वेटलॉससाठी फायदा होतो.

Click Here