लवंग फक्त स्वयंपाकातच नाही तर आरोग्यासाठीही फायद्याची असते.
लवंग हा पदार्थ फक्त मसाला म्हणून वापरला जात नाही. तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
प्रवासात जाताना जवळ लवंग ठेवा. लवंग चघळल्यामुळे उलटी होत नाही. पोटात दुखत नाही.
पचनासाठी लवंग चांगली असते. ब्लोटींग, गॅसेस सारखे त्रास होत नाहीत. त्यामुळे चहातही लवंग घालतात.
दातांच्या आरोग्यासाठी लवंग फार चांगली असते. दात दुखत असेल तर त्यावर लवंग तेल लावले जाते. तसेच लवंग चघळणे फायद्याचे ठरते.
लवंग चघळल्याने तोंडाचे आरोग्य चांगले राहते. जंतू नाहीसे होतात आणि तोंड स्वच्छ होते.
घशासाठी लवंग फायद्याची असते. कफ कमी होतो. खोकला असेल तर ठसका कमी लागतो.