आहारात तमालपत्र असावे. पाहा किती फायद्याचे असते हे लहानसे पान.
सुक्या मसाल्यांपैकी एक महत्त्वाचा मसाला म्हणजे तमालपत्र. स्वयंपाकघरात हे असतेच.
तमालपत्रामुळे पचनशक्ती सुधारते. अपचन कमी होते. पोटाला आराम मिळतो. गॅस होत नाहीत.
तमालपत्र भूक वाढवते. त्यामुळे जर तुम्हाला भूक लागत नसेल तर आहारात तमालपत्र असावे.
तमालपत्र उष्ण असते. त्यामुळे सर्दी, कफ, खोकला कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो. काढ्यासाठी त्याचा वापर करावा.
तमालपत्रात अँटी ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्याचा फायदा होतो.
फोडणीत तमालपत्र घालता येते. तसेच भातामध्येही घालता येते. भातात एखादं पान घातले तरी त्यातील तत्त्वे मिळतात.