उपाशी पोटी खा हे पदार्थ, पित्त होणार नाही 

पित्ताचा त्रास अजिबात होणार नाही. नक्की खा हे पदार्थ. पाहा काय खावे. 

रिकाम्यापोटी काहीही खाल्ले तरी चालते असे वाटते?  त्यामुळेच पचन चांगले होत नाही आणि पित्त वाढते. उपाशी पोटी खावेत असे काही पदार्थ आहेत. 

जसे की उपाशी असताना सगळ्यात आधी ग्लासभर कोमट पाणी प्या. म्हणजे अन्न बाधत नाही आणि पचन छान होते. 

रात्री बदाम भिजवायचे सकाळी पहिले ते खावे आणि दिवसाची सुरवात करावी. जीवनसत्वे आणि पोषण मिळते. 

सफरचंद फार पौष्टिक असते. त्यामुळे सकाळी नाश्त्याला किंवा नाश्त्याआधी सफरचंद नक्की खा. ताजे सफरचंद अजिबात बाधणार नाही. 

गरम पाण्यात चमचाभर मध मिसळा आणि प्या. पचनसाठी अगदीच उत्तम आहे. 

ओट्स म्हणजे पोषणही आणि वजन वाढण्याची चिंताही नाही. नाश्त्याला ओट्स नक्की खा. 

केळी खाण्याचा फायदा होतो. तोटा काहीच नाही. फक्त सर्दी असेल तर केळे कोणत्याही वेळी खाणे टाळावे. 

Click Here