कुरळे केस दिसायला सुंदर असले तरी अनेकदा कोणती हेअरस्टाईल करू, असा प्रश्न पडतो.
कुरळे केस हे मुळातच आकर्षक आणि एक वेगळाच हटके लूक देतात.
योग्य हेअरस्टाईल केल्यास कुरळ्या केसांचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसतं आणि चेहऱ्यावर स्टायलिश, कॉन्फिडंट लूक येतो.
कुरळे केस असतील तर काही खास हेअरस्टाईल्स निवडल्या, तर आपला लूक सुंदर आणि ग्लॅमरस दिसू शकतो.
अशाच काही स्टायलिश आणि ट्रेंडी हेअरस्टाईल्स पाहूयात, ज्या कुरळ्या केसांवर खास शोभून दिसतात.
केसांचा वरील भाग अर्धा बांधून खाली कर्ल्स सोडले तर अशी हाल्फ बन हेअरस्टाईल क्युट आणि स्मार्ट लूक देते.
कुरळ्या केसांची साधी वेणी जरी वेगवेगळ्या पद्धतीने बांधली तरी आपला लूक क्लासी दिसतो. कुरळ्या केसांच्या ब्रेड हेअरस्टाईल आपण ट्राय करु शकता.
कुरळ्या केसांची हाय पोनीटेल हेअरस्टाईल अतिशय स्टायलिश दिसते. वेस्टर्न ड्रेसवर अशी हेअरस्टाईल शोभून दिसते.
हाय स्लीक बन हेअरस्टाईल कुरळ्या केसांसाठी सुपरस्टायलिश आणि सोपी हेअरस्टाइल आहे, जी अधिक खास दिसते.
कुरळ्या केसांची मेस्सी बन हेअरस्टाईल पार्टीसाठी फ्रेश आणि युनिक दिसतात.
साइड पार्टिंगने सोडलेले सॉफ्ट कर्ल्स तुमच्या कुरळ्या केसांना ग्लॅमरस टच देतात.