हिवाळ्यात हिटरशिवाय घर उबदार ठेवण्यासाठी ५ टिप्स

थंडीचा कडाका वाढलेला असताना घर उबदार ठेवण्यासाठीच्या या काही टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडू शकतात..

खिडकी आणि दरवाज्यांसाठी नेहमीच्या पडद्यांपेक्षा थोडे जाड पडदे वापरा. यामुळे बाहेरची थंडगार हवा घरात येत नाही.

बेडच्या आजुबाजुला, सोफ्याच्या समोर, स्वयंपाक घरात कार्पेट अंथरुण ठेवा. यामुळे उबदार वाटेल.

सकाळी, दुपारी जेव्हा ऊन असेल तेव्हा घराच्या खिडक्या उघड्या ठेवा. त्यामुळे घरात ऊन येऊन उब टिकून राहाते.

दरवाजे, खिडक्या यांच्यामध्ये असणारे छोटेसे गॅपही बंद करा. त्यामुळेही घरात येणारा गारवा बंद होतो आणि घरात उबदार वाटू लागते.

घरातले लाईट थोडे बदला. कुलिंग इफेक्ट देणाऱ्या लाईटऐवजी वार्म इफेक्ट देणारे लाईट लावा. 

Click Here