1754 पासून जपलेली परंपरा...
गुरुपौर्णिमेनिमित्त तळघर दर्शनाची खास संधीश्री त्रिशुंड गणपती मंदिराचे तळघर वर्षातून फक्त एकदाच, गुरुपौर्णिमेला दर्शनासाठी खुले केले जाते.
उद्या, 10 जुलै रोजी दर्शनाची वेळगुरुवार, 10 जुलै रोजी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत तळघर सर्व भाविकांसाठी खुले असेल.
दलपतगिरी गोसावी यांची समाधीया तळघरात दलपतगिरी गोसावी यांची समाधी असून भाविक येथे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात.
ऐतिहासिक निर्मिती – इ.स. 1754हे मंदिर इंदूरजवळील धामपूर येथील गोसावी भीमगिरजी यांनी 26 ऑगस्ट 1754 रोजी उभारले.
वास्तुशैलीची खासियतमंदिराची वास्तुशैली वेरूळच्या कोरीव लेण्यांसारखी असून शिवमंदिराच्या धर्तीवर तयार केली आहे.
त्रिशुंड गणपती मूर्तीचे वैशिष्ट्यया मंदिरातील गणपतीची त्रिशुंड (तीन सोंडांची) मूर्ती महाराष्ट्रात अतिशय दुर्मिळ आहे.
तळघरातील जिवंत झरातळघरात एक जिवंत झरा असून दरवर्षी गुरुपौर्णिमेनंतर याची स्वच्छता केली जाते.
अध्यात्मिक व ऐतिहासिक महत्त्वहे मंदिर पुणेकरांचे श्रद्धास्थान असून ऐतिहासिक व अध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानले जाते.
सोमवार पेठेतील प्रमुख आकर्षणहे मंदिर सोमवार पेठेतील एक ऐतिहासिक आणि शिल्पवैभवाने सजलेले महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे.