सबसे कातिल गौतमी पाटील!

गौतमी पाटीलच्या लेटेस्ट फोटोंना मिळतेय पसंती

नृत्यांगणा गौतमी पाटील सतत चर्चेत येत असते. सोशल मीडियावर ती सक्रीय असून चाहत्यांना अपडेट देत असते.

नुकतेच गौतमीने सोशल मीडियावर मराठमोळ्या अंदाजातील फोटोशूट शेअर केले आहे.

या फोटोशूटमध्ये तिने गुलाबी रंगाची काठपदराची साडी नेसली आहे. त्यावर हिरव्या रंगाचा नक्षीकाम असलेला ब्लाउज परिधान केलाय.

साडीवर तिने नाकात नथ, मोठे कानातले आणि कपाळावर मोठी चंद्रकोर लावली आहे. या गेटअपमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे.

गौतमी पाटीलच्या या फोटोत लावणीतल्या काही अदादेखील पाहायला मिळत आहेत.

गौतमी पाटीलच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. अलिकडेच गौतमी शिट्टी वाजली रे या कार्यक्रमात पाहायला मिळाली होती. 

Click Here