राधा ही बावरी...!

लोकप्रिय डान्सर गौतमी पाटीलने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त राधाच्या लूकमध्ये फोटोशूट केलंय.

 गौतमी पाटील हे नाव आता महाराष्ट्रातील घराघरात परिचयाचं झालं आहे. 

आपल्या दिलखेचक अदा आणि ठसकेबाज लावणीने तरुणाईच्या मनावर राज्य करणाऱ्या गौतमीची कायमच चर्चा असते. 

आता सबसे कातिल गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त स्पेशल फोटोशूट केलंय.

फोटोशूटमध्ये गौतमी पाटीलने पिंक आणि निळ्या रंगाचा लेहंगा परिधान केलाय. हाताला मेहंदी लावलीय.

हातात मोरपीस घेऊन गौतमीने फोटोशूट केलंय. तिच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. 

Click Here