त्वचेसाठी वरदान असणारी काही फुलं...

काही फुलांमध्ये असणारे घटक त्वचेचं सौंदर्य खुलवून तिला नेहमीच तरुण, तजेलदार ठेवण्यासाठी मदत करतात.

त्या फुलांपैकी एक आहे गुलाब. त्वचा हायड्रेटेड, मॉईश्चराईज ठेवण्यासाठी गुलाब किती उपयुक्त आहे, हे तर आपल्याला माहितीच आहे. वेगवेगळ्या कॉस्मेटिक्समध्ये गुलाबपाणी नेहमीच वापरले जाते.

झेंडूच्या फुलांचा काढाही त्वचेही खूप फायदेशीर असतो. चेहऱ्यावरची सूज तर त्यामुळे कमी होतेच, पण अकाली सुरकुत्याही येत नाहीत.

जास्वंदाचं फूल तर त्वचेसाठी एवढं उत्तम आहे की त्याला नॅचरल बोटॉक्स म्हणून ओळखलं जातं. 

चेहरा नेहमीच फ्रेश आणि चमकदार ठेवण्यासाठी लव्हेंडर खूप उपयुक्त आहे. त्यामुळे त्वचेवर कमी वयात सुरकुत्या येत नाहीत.

कमळाच्या पाकळ्यांमध्येही ॲण्टीऑक्सिडंट्स आणि फॅटी ॲसिड चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचेवरील पिगमेंटेशन कमी करण्यासाठी कमळाच्या पानांचा उपयोग होतो.

केशर देखील त्वचेसाठी अतिशय गुणकारी असून सौंदर्य खुलविण्यासाठी केशराचा खूप वेगवेगळ्या पद्धतींनी उपयोग करता येतो. 

Click Here