चेहरा सुजल्यासारखा दिसतो? त्वचा घट्ट होत आहे? पाहा काय कारणे आहेत.
चेहर्याला सुज नसतानाही तो सुजल्यासारखा दिसतो. कारण म्हणजे वाढलेले फेस फॅट. चेहऱ्याची त्वचा जाड होते आणि तोंड फुगल्यासारखे वाटायला लागते.
फेस फॅट कमी करण्यासाठी वेगळे उपाय करावे लागतात. त्याचे काही व्यायामही असतात. मात्र त्या व्यायामांसोबत काही नियम पाळावे लागतात.
आहारात बदल करणे गरजेचे ठरते. चुकीच्या खाद्य पदार्थांचा आहार समावेश असल्यावर चेहरा सुजायला लागतो. जाड होत जातो. त्वचा घट्ट होते. मऊ राहत नाही.
रोज किमान आठ ते दहा ग्लास भरुन पाणी पिणे फार गरजेचे आहे. शरीरातील पाणी कमी झाल्यावर चेहर्याजवळ फुगवटा तयार होतो.
व्यसन करणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. मध्यपान केल्यामुळे चेहरा सुजायला लागतो. डोळ्याखाली आणि हनुवटीजवळ त्वचा फुगते. त्यामुळे व्यसने करु नयेत.
मीठ जास्त खाल्यामुळेही चेहरा फुगतो. शरीरातील सोडियम योग्य प्रमाणात राहील याची काळजी घ्यायची.
चेहर्यासाठीचे व्यायाम करायचे. तसेच इतरही व्यायाम करा. घाम आल्यावर फॅट्स कमी होतात.
मानसिक ताणामुळेही चेहरा फुगतो. ताणतणावाची समस्या असेल किंवा कशाचा अति विचार करत असाल तरी त्वचा घट्ट होते. झोप कमी झाल्यामुळे चेहरा फुगतो.