चेहर्‍यावरची चरबी कमी करण्यासाठी ५ व्यायाम 

चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी अगदी सोपे आणि मस्त व्यायाम. बसल्या-बसल्या करा. 

फेस फॅट कमी करण्यासाठी अगदी सोपे व्यायाम असतात. बसल्याबसल्या कधीही करता येतात. दिवसातून दोनदा करा. चेहरा छान सुंदर दिसेल. हे पाच व्यायाम नक्की करा. 

चीक लिफ्ट
गालवर उचलून मोठी स्माइल द्यायची. तोंड कोपऱ्यातून वरच्या दिशेने ओढायचे. १० वेळा तरी करा.

फीश फेस
गाल आत ओढून माश्यासारखे तोंड करायचे. गालाला गाल आतल्या बाजूने लावायचा प्रयत्न करा. 

जॉ स्ट्रेच
 तोंड मोठं उघडा. खालचा जबडा पुढच्या दिशेने ढकलायचा प्रयत्न करायचा. जाबड्यावर प्रेशर यायला हवे. डबल चिन कमी करण्यासाठी मदत होते. 

चीक पफींग
 गालात हवा भरायची. गाल जेवढे जमेल तेवढे फुगवायचे. स्नायूंवर ताण यायला हवा. फेस फॅट कमी करण्यासाठी फायदा होतो. 

नेकलिफ्ट
 मान वरच्या दिशेने करायची. ओढायची प्रयत्न करायचा. वरच्या दिशेने मान स्ट्रेच करत राहायचे. डबल चिन कमी होते. 

Click Here