डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काय करावे ? सोप्या गोष्टी लक्षात ठेवा.
झोप न झाल्याने, ताणतणाव, कामाचा ताण, तसेच कोणताही मानसिक किंवा शारीरिक त्रास असला की तो डोळ्यांवर परिणाम करतो.
डोळे मलूल दिसायला लागतात. डोळ्यांचे तेज कमी होते आणि सुजलेले दिसतात. तसेच पाणावलेले वाटतात. डोळ्यांची काळजी घेणे फार गरजेचे असते.
हाताच्या ओंजळीत मध्यम गार पाणी घ्यावे आणि डोळे पाण्यात उघडबंद करावे. त्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो.
मोबाइल, लॅपटॉपचा अति वापर टाळा. डोळ्यांवर त्याचा प्रचंड ताण पडतो. दृष्टीही कमी होते.
गाजर, पालक, संत्री, अक्रोड, आदी जीवनसत्त्व ए आणि सी असलेले पदार्थ खा. डोळ्यांसाठी ते फार फायद्याचे असते.
डोळ्यावर काकडीचे तुकडे ठेवायचे. त्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो. तसेच करायला सोपा असा उपाय आहे.
गॉगल फक्त स्टाइलसाठी लावला जात नाही. जास्त उन्हात फिरत असाल तर डोळ्यांसाठी गॉगल फायद्याचा ठरतो.