आखडलेले शरीर मस्त फ्रेश करण्यासाठी काही व्यायाम करणे फायद्याचे ठरेल.
सकाळी उठल्यावर शरीर जरा जड वाटते. तसेच आळस पटकन जात नाही. शरीर आखडल्यासारखे वाटते.
सकाळी उठल्यावर मान जरा आखडलेली राहते. त्यासाठी मान गोल फिरवण्याचा व्यायाम करा. बसल्याबसल्या करता येतो. मान मोकळी होईल.
बसल्याबसल्या कंबरेमध्ये वाका. दोन्ही बाजूने कंबर मोकळी व्हावी म्हणून कंबर जरा हलवा. उठून कंबर गोल फिरवा.
ताडासन करा. अगदी सोपे असे हे योगासन आहे. हात डोक्यावर सरळ घेऊन एक पाय दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवायचा. आळस निघून जाईल.
पायाचा अँकल गोल फिरवा. पायाला आराम मिळेल. पायावर आलेला ताण तसाच राहणार नाही.
हाताचे मनगटही गोल फिरवा. त्याचाही फायदा होतो. हातामध्ये उठल्यावर जोर नसतो. त्यासाठी हा व्यायाम छान आहे.
बसल्याबसल्या पाय लांब करा आणि वाकून पायाची बोटे धरायचा प्रयत्न करा.
खांदे ताणा आणि हात पुढे मागे फिरवा. खांद्याच्या हालचाली करा. हात मागे नेण्याचा प्रयत्न करा. खांद्यावर जरा ताण पडू द्या.