वजन वाढवण्यासाठी आहारा असावेत हे पदार्थ. पाहा कोणते आहेत.
स्थुल असणे जसे चांगले नाही तसेच शरीर अगदीच दुबळे असणेही चांगले नाही. शरीर निरोगी ठेवणे गरजेचे असते.
वजन वाढवण्यासाठी अरबटचरबट खाणे नक्कीच योग्य नाही कारण त्या वजनामुळे फायदा नाही त्रासच होईल.
पौष्टिक पदार्थ खाऊन वजन वाढवणे हा पर्याय निवडावा. पाहा आहारात काय घेऊ शकता.
आहार सोयाबिन घ्यायला सुरवात करा. त्यात प्रोटीन असते. हेल्दी फॅट्स मिळतात.
पनीर वजन कमी करण्यासाठी खाल्ले जाते. मात्र पनीर फार पौष्टिक आहे. आहारात पनीर असावे.
दुग्धजन्य पदार्थ आहारात असणे एकदम फायद्याचे ठरेल. रोज दूध प्यायचे. ताकही पित जा.
बदाम, काजू, अक्रोड, इत्यादी सुकामेवा आहारात असावा. रोज थोडा सुकामेवा खा.
आहारात भरपूर भाज्या घ्यायच्या. गाजर, पालक, दुधी आहारात असावे. इतरही भाज्या खात जा.