विकतचा नकोच, घरीच करा सुंदर आकाशकंदील. पाहा सोप्या पद्धती.
दिवाळी हा असा सण आहे जो आल्यावर साफसफाई तर केली जातेच. शिवाय कलाकुसरीलाही वाव मिळतो. आकाशकंदील, रांगोळी आणि इतरही सजावट करता येते.
आकाशकंदील घरी तयार करणे फार सोपे आहे. त्यामुळे विकत आणायची खरंतर गरज नसते. लहान मुलांना तो तयार करण्यात मजाही येते.
हे काही पॅटर्न नक्की पाहा. करायला सोपे आहेत आणि दिसतातही सुंदर. यंदा कंदील घरीच तयार करा. त्याची मजाच काही वेगळी असते.
कापडी आकाशकंदील फार सुंदर दिसतो. तसेच करायलाही सोपा आहे.
झिरमिऱ्या लावलेला कंदील लहान मुलेही आरामात करु शकतात.
काहीतरी वेगळे आणि युनिक करायचे असेल तर हे डिझाइन नक्की करुन पाहा. अगदी सोपे आहे.
अगदी सोपा प्रकार म्हणजे काड्यांचा वापर करुन केलेला आकाशकंदील. काड्यांचा सेट बाजारात आरामात मिळतो.
अष्टकोनी आकाशकंदील करायला सोपा असतो. तसेच दिसतोही फार सुंदर.