सगळ्यात जास्त पौष्टीक ठरतं मातीच्या भांड्यात बनवलेलं जेवण...

 वाचा आजार कसे दूर होतात..

 मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्यास लोह, फायबर, कार्बोदके, फॉस्फरस, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मिळण्यास मदत होते, जे शरीरासाठी खूप फायदेशीर असते.

पाहूयात मातीची भांडी वापरण्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे

 खनिजांचा उत्तम स्त्रोत
मातीच्या भांड्यात लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस चांगल्या प्रमाणात असते त्यामुळे शरीरातील खनिजांची कमतरता दूर होण्यास याचा चांगला उपयोग होतो.

 pH पातळी सुधारण्यास मदत
मातीच्या भांड्यात असणारे क्षार अन्नातील रसायनांवर प्रक्रिया करतात. त्यामुळे अन्नातील pH पातळी वाढते.

 अन्न चांगले शिजण्यास मदत
मातीच्या भांड्यात असणारी लहान छिद्र आग आणि ओलावा समान रीतीने सगळीकडे पसरण्यास मदत करतात ज्यामुळे अन्नातील पोषक तत्त्व सुरक्षित राहतात. 

 हृदयासाठी चांगले 
 मातीमुळे अन्नात नैसर्गिक तेल आणि ओलावा टिकण्यास मदत होते अशावेळी शिजवलेले अन्न हृदयासाठी उपयुक्त ठरते. 

 डायबिटीसच्या रुग्णांसाठी फायदेशीर
जर शरीरास योग्य प्रकारे शिजवलेले आणि पौष्टिक समृद्ध अन्न मिळाले तर डायबिटीसही नियंत्रणात राहतो. जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप महत्वाचे आहे.

एसिडिटीपासून बचाव
मातीची भांडी नैसर्गिकरित्या अल्कधर्मी असतात, जी एसिडिटीचा सामना करण्यासाठी फायेदशीर ठरतात.

Click Here