दूध एक ग्लास, तब्येत फर्स्टक्लास 

रोज दूध पिणे आरोग्यासाठी फार उपयुक्त ठरेल. पाहा किती फायदे मिळतात. 

दूध पिणे आरोग्यासाठी फार चांगले असते. हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. लहान मुलांसाठीच नाही तर सगळ्यांसाठीच दूध गरजेचे असते. 

आपल्याकडे दुधाला संपूर्ण अन्न असे म्हटले जाते. शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांनी दूध परिपूर्ण असते. 

दुधात कॅल्शियम असते. हाडे व दात मजबूत ठेवण्यासाठी दूध प्यावे. त्यात फॉस्फरस आहे आणि पोटॅशियमही असते. 

दुधात प्रथिने असतात. केसिन सारखे घटक दुधातून मिळतात. स्नायूंसाठी ते फायद्याचे असतात. 

अनेक जीवनसत्त्वांनी दूध परिपूर्ण असते. त्यात जीवनसत्व 'बी2', 'डी' असते. शरीरासाठी फार गरजेचे. 

दुधातून शरीराला ऊर्जा मिळते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. इतरही अनेक फायदे आहेत. 

दुधात झिंक असते. सेलेनियमही असते आणि आयोडीन असते. शरीर क्रियांसाठी हे सारेच गरजेचे आहे. 

Click Here