जाणून घ्या आल्याचे पाणी पिण्याचे फायदे. आरोग्यासाठी ठरते फार फायद्याचे.
आलं पाणी हा एक अतिशय सोपा, नैसर्गिक आणि प्रभावी घरगुती उपाय मानला जातो. नियमितपणे आलं पाणी प्यायल्याने शरीराला अनेक प्रकारचे आरोग्यदायी फायदे मिळू शकतात.
आलं पाणी पचन सुधारण्यासाठी अगदी उत्तम असा उपाय आहे. पोटासाठी ते एकदम चांगले असते.
जर सारखी सर्दी होते , खोकला होतो, तर रोज सकाळी आलं पाणी पिणे फायद्याचे ठरते.
थंडीच्या दिवसांत शरीराला ज्या उबेची गरज असते. ती आल्यातून मिळते. त्यामुळे आल्याचे गरम पाणी किंवा काढा रात्री पिणे आरामदायी ठरते.
आलं दाहशामक आहे. तसेच पित्तावरही फायद्याचे आहे. त्यामुळे आरोग्यासाठी ते चांगले ठरते.
मळमळ, उलटी, प्रवासाचा थकवा यामुळे जर त्रास होत असेल तर आल्याचे पाणी आराम देते. रोज कपभर प्या.