रोज सकाळी दुधीचा रस प्या, फायदेच फायदे

पोट कमी करण्यासाठी रोज सकाळी प्या हे एक ड्रिंक. इतरही अनेक फायदे आहेत. 

दुधी भोपळ्याची भाजी तर खाताच मात्र माहिती आहे का?  त्याचा रस काढून रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने अनेक फायदे मिळतात. 

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दुधी भोपळ्याचा ज्यूस पिणे म्हणजे आरोग्यासाठी अगदी फायदेशीर ठरणारा उपाय आहे. दुधीमध्ये अनेक पोषणसत्वे असतात.

 शरीराला थंडावा मिळावा यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. फक्त थंडावाच नाही इतरही अनेक फायदे मिळतात. 

वजन कमी करण्यासाठी हा रस उपयुक्त ठरतो. त्यामध्ये कॅलेरिज कमी असतात. पोषण जास्त असते. पाण्याचे प्रमाण जास्त असते.

चांगले मस्त पचन व्हावे यासाठी हा रस मदत करतो. पोटासाठी दुधीची भाजी चांगली असते त्यापेक्षा ताजा रस जास्त चांगला.

दुधीमध्ये अँण्टी ऑक्सिडंट्स असतात व जीवनसत्त्व 'सी' असते. त्वचेसाठी त्याचा उपयोग होतो. त्वचा उजळते. 

हृदयासाठी ही भाजी फार पौष्टिक असते. त्यामध्ये पोटॅशियम असते. प्रेशरवर नियंत्रण राहते.

Click Here