ताराबाईंनी सांगितलं, मराठी ही सजीव भाषा..

मराठीबद्दल तारा भवाळकर यांचे भाषण सगळ्यांना एवढे आवडले की सध्या सोशल मिडियावर त्याचीच चर्चा. 

डॉ. तारा भवाळकर. मराठी साहित्य संमेलनातलं त्यांचं भाषण व्हायरलच्या जगात सध्या प्रचंड गाजतं आहे.

मराठी लोकसाहित्य, संत साहित्य आणि स्त्रीवाद या विषयांवर प्रभुत्व मिळवून साहित्य क्षेत्रात त्यांनी पीएचडी  ही त्यांची ओळख मात्र त्यांचा व्यासंग आणि आपले विचार अत्यंत परखडपणे मांडण्याची शैली आगळी आहे.

२०२५ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या ९८व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या. डॉ. तारा या मराठी साहित्याच्या इतिहासातील सहाव्या महिला अध्यक्ष ठरल्या. 

अध्यक्षीय भाषणात त्यांनी मराठी भाषा, संत साहित्य -मराठीचे सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले. त्यांचे हे भाषण प्रचंड गाजले. 

आता मराठी भाषा आणि हिंदी सक्ती या वादात पुन्हा एकदा त्यांचे ते भाषण व्हायरल झाले आहे.

भाषा सजीव असते आणि ती जगवावी लागते हे डॉ. तारा भवाळकरांचं म्हणणं मराठी माणसाला समजेल, आपल्या भाषेची ताकद आणि गौरव समजेल तो खरा सुदीन.

Click Here