ओठांची काळजी घ्या, करा 'हे' उपाय 

ओठांची काळजी घेण्यासाठी करा हे उपाय थंडीच्या दिवसांत ओठांना मिळेल आराम. होतील मऊ आणि गुलाबी. 

थंडीत ओठ फुटून फार खराब दिसतात. दिसण्याचे सोडा झोंबतात इतके की पाणी पितानाही आग होते. त्यावर काही सोपे उपाय करता येतात. 

ओठ ओले राहावेत म्हणून जीभ फिरवत असाल तर ओठ कोरडे होण्याचे मोठे कारण तेच ठरते. त्यामुळे ही सवय टाळणे हा पहिला भाग झाला. 

दिवसातून दोनदा ओठांना तूप लावा. तुपामुळे ओठांना ओलावा तर मिळतोच शिवाय पोषणही मिळते.   

लिपबाम, लिपस्टिक काहीही वापरण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. चांगल्या विश्वासू कंपनीचेच प्रॉडक्ट्स वापरा. 

ओठांची निघालेली त्वचा काढू नका. दातांनी चावत राहण्याची सवय सोडा. त्यामुळे जखमा होतात. 

बीटाचा रस लावणे फायद्याचे ठरते. ओठांना पोषण मिळते. रंगही छान गुलाबी होतो. 

Click Here