भरपूर व्यायाम नको फक्त स्क्वॉट्स करुन मिळतील 'हे' फायदे 

फक्त एक व्यायाम करुन मिळवा अनेक फायदे. रोज पाच मिनिटे स्वतःसाठी काढा. 

तुम्हाला जर रोज भरपूर व्यायाम करायला जमत नसेल किंवा वेळ नसेल तर थोडे स्क्वॉट्स मारणेही ठरते आरोग्यासाठी फायद्याचे. 

स्क्वॉट्स हा एक फुल बॉडी अ‍ॅक्टिव्हेशन देणारा व्यायाम आहे. पोट, पाठ, कंबर, स्नायू साऱ्यांसाठीच हा व्यायाम फायद्याचा आहे. 

स्क्वॉट्सचा आणखी एक फायदा म्हणजे कॅलरी बर्न. तसेच जास्त जागाही लागत नाही. कुठेही उभ्या - उभ्या हा व्यायाम करता येतो. 

मांड्यांचा आकार कमी करण्यासाठी आणि पायातील ताकद वाढवण्यासाठी एकदम मस्त व्यायाम आहे. करायलाही सोपा आहे. सवयीने प्रमाणही वाढवता येते. 

खाली अर्ध्यापर्यंत बसायचे. खुर्चीवर बसल्यासारखे बसायचे आणि उठायचे. असेच सलग किमान दहा वेळा तरी करायचे. 

पचनासाठी हा व्यायाम एकदम छान आहे. त्यामुळे नक्की करा. रोज सकाळी केला तर जास्त फायदा होतो. 

Click Here